सामाजिक-भावनिक शिक्षणामुळे आम्ही शिक्षक मुलांसाठी हात छडी घेऊन उभे असलेले ‘सर’ न राहता, त्यांच्या हातात हात घालून त्यांच्यासोबत प्रवास करणारे मित्र बनलो!

या सर्वांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शैक्षणिक आणि इतर बाबींवर झाला. वर्षाच्या सुरुवातीला ५७ टक्के विद्यार्थ्यांची वाचन आकलनक्षमता त्यांच्या इयत्तेपेक्षा तीन वर्षांनी कमी होती, तो आकडा ३८ टक्क्यांपर्यंत खाली आला. गणितात आधी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले फक्त २८ टक्के विद्यार्थी होते, तो आकडा ६१ टक्क्यांपर्यंत पोहचला. त्या व्यतिरिक्त मुलं स्वतःच्या भावना आणि कृती यांतला संबंध समजू लागली.......